Eligibility - MR 🇮🇳

a clinical study for people with

ulcerative colitis

TH2262~3.PNG
  • 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे पुरुष आणि महिला या अभ्यासामध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या इथे क्लिक करा

  • सहभागींनी स्वाक्षरी केलेले माहितीपूर्ण संमती प्रपत्र प्रदान करण्यासाठी सक्षम असणे आवश्यक आहे.

  • सहभागींमध्ये कोलोनोस्कोपीद्वारे खात्री केलेल्या गुदद्वाराच्या टोकापासून 15 सेमी (5.9 इंच) पेक्षा जास्त नसलेल्या मध्यम ते गंभीर अल्सरेटिव्ह कोलायटिसचे निदान झाले पाहिजे.

  • सहभागींच्या बाबतीत यापूर्वी अधिक व्यापक रोगाचे निदान झालेले असू शकते, परंतु नावनोंदणीच्या वेळी केवळ मलाशयापुरता मर्यादित सक्रिय अल्सरेटिव्ह कोलायटिस असलेले रूग्णच या सहभागास पात्र ठरतात.

  • मूल जन्माला घालण्याची क्षमता असलेले पुरुष आणि महिला एकतर लैंगिकदृष्ट्या निष्क्रिय असणे आवश्यक आहे किंवा अभ्यास सुरू होण्याच्या अगोदर किमान 21 दिवस आणि उपचार कालावधीत स्वीकार्ह गर्भनिरोधक पद्धती वापरण्यास सहमत असणे आवश्यक आहे.

  • गुद्द्वारामार्गे लैंगिक संबंध, गुदद्वाराचे ब्लिचिंग आणि वॅक्सिंग इत्यादींपासून दूर राहण्याची तयारी असलेले सहभागी

  • जिवाणू किंवा इतर संसर्गजन्य कोलायटिस, रेडिएशन-इन्ट्रिटिक्स आणि रेडिएशन-प्रोक्टायटीस, क्रोन्स डिसीझ, कोलिजेन्स कोलायटिस आणि अनिश्चित कोलिटिक्स, वारंवार होणारा  स्वादुपिंडाचा रोग, स्क्लेरोसिंग कोलांगिटिस, सिरोसिस किंवा यकृत बिघाड, नितंबाचे व्हस्क्यूलर नेक्रोसिसचा वैद्यकीय इतिहास किंवा वर्तमान निदान.

  • आधी वगळलेली गॅस्ट्रोइंटेस्टाइनल शस्त्रक्रिया, इतर सक्रिय गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोग (इरिटेबल बाऊल सिंड्रोम शिवाय) किंवा आतड्याची बिघडलेली रचना.

  • नावनोंदणीच्या वेळी रक्ती मूळव्याध किंवा शारीरिक व्यवस्थेतील सक्रिय संसर्ग.

  • पुन्हा पुन्हा होणाऱ्या डायव्हर्टिकुलाइटिसचा इतिहास आणि / किंवा नावनोंदणीच्या वेळी वारंवार होणारा डायव्हर्टिकुलाइटिस

  • यापूर्वी निदान झालेल्या गंभीर, वाढणाऱ्या किंवा अनियंत्रित रोगांचा इतिहास, जे रोग अभ्यास प्रोटोकॉलमध्ये वगळण्याचे निकष म्हणून सूचीबद्ध केलेले आहेत.

  • वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेली ईसीजीमधील अपसामान्य स्थिती, किंवा छाननीच्या वेळेस दिसणारे यकृताचे अपसामान्य कार्य.

  • सीरम हिमोग्लोबिनचे स्तर <7.5 ग्रॅम / डीएल.

  • सायटोमेगालोव्हायरस, क्षयरोग, मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, हेपॅटायसिस बी किंवा सी संसर्गाच्या बाबतीत छाननीच्या वेळेस चाचणीचा सकारात्मक परिणाम

  • ॲडिसन रोगाचे निदान, जन्मजात ॲड्रेनल हायपरप्लासिया किंवा इतर प्रकारची ॲड्रिनल त्रुटी.

  • स्टेरॉइड उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या अल्सरेटिव्ह कोलायटिसचा इतिहास.

  • छाननीच्या वेळेस एंटरिक पॅथोजेन, क्लोस्ट्रिडियम डिफिसाइलची सकारात्मक मल चाचणी किंवा ओवा अथवा परजीवींची उपस्थिती

  • छाननीच्या वेळी गर्भवती किंवा स्तनपान देणारी महिला.

  • छाननी भेटीच्या 30 दिवसांच्या आत आणि अभ्यासादरम्यान एखाद्या अन्वेषणाधीन औषधाच्या अन्य अभ्यासात सहभाग.

 

अभ्यासामध्ये कशाचा समावेश आहे आणि अभ्यास सहभागींना काय करावे लागेल याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, इथे क्लिक करा


सध्या जगभरातील चिकित्सालयीन संशोधन केंद्रांमध्ये नोकरभरती केली जात आहे. आपल्याजवळचे संशोधन केंद्र शोधण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

GB 4.1.5.3 Cessa flavicon.png
 

Cristcot HCA LLC 9 Damonmill Square, Suite 4A, Concord, MA 01742 USA

गोपनीयता धोरण | वापरण्याबाबत अटी

सेसा हे अल्सरेटिव्ह कोलायटिस असलेल्या रूग्णांसाठीच्या चालू चिकित्सालयीन संशोधन चाचणीचे नाव आहे. हे व्यावसायिकतत्त्वावर उपलब्ध असलेले उपचार नाहीत.

आपल्याला आयबीडीशी संबंधित लक्षणे जाणवत असतील तर आपल्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टशी संपर्क साधा.