Privacy Policy - MR 🇮🇳

a clinical study for people with

ulcerative colitis

गोपनीयता धोरण


लागू तारीख: 1 जानेवारी 2020 सूचना आवृत्ती: 1.0

हा दस्तऐवज cessa-uc.com या आमच्या वेबसाइटची गोपनीयता सूचना निर्धारित करतो. cessa-uc.com वेबसाइटचे मालक आणि प्रचालक असलेली Cristcot HCA LLC. (जी „क्रिस्टकॉट”, „सेसा”, „cessa-uc” किंवा „वेबसाइट” म्हणून ओळखली जाते), जेव्हा आपण ही वेबसाइट वापरता, तेव्हा कोणत्याही „वैयक्तिक माहिती” चा वापर आणि संरक्षण कसे करते याचे तो वर्णन करतो.

आम्ही आपली वैयक्तिक माहिती कशी गोळा करतो, वापरतो, संरक्षित करतो किंवा अन्यथा कशी हाताळतो हे स्पष्टपणे समजून घेण्यासाठी कृपया आमची गोपनीयता सूचना काळजीपूर्वक वाचा.

आम्ही हे पृष्ठ अद्यतनित करून वेळोवेळी ही गोपनीयता सूचना बदलू शकतो. आपण कोणत्याही बदलांशी सहमत आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आपण हे पृष्ठ वेळोवेळी तपासले पाहिजे.

या धोरणाशी संबंधित प्रश्नांसाठी आणि टिप्पण्यांसाठी संपर्क माहिती आहे: research@cessa-uc.com.

आमच्या गोपनीयता धोरणामध्ये असलेले विषय

आपले अधिकार

आम्ही कोणती वैयक्तिक माहिती गोळा करतो?

आम्ही आपली माहिती कशी वापरतो?

आपली वैयक्तिक माहिती वापरण्यासाठी पार्श्वभूमी

आम्ही आपली माहिती कशी संरक्षित करतो?

आपली वैयक्तिक माहिती राखणे आणि नष्ट करणे

कायदेशीररित्या आवश्यक माहिती जाहीर करणे

उत्तराधिकाऱ्यांना उघड करणे

आपली वैयक्तिक माहिती वापरण्याबद्दलची आपली संमती मागे घेणे

आंतरराष्ट्रीय डेटा हस्तांतरणे आणि साठवण

वेब बीकॉन्स

गूगल अ‍ॅड आणि सामग्री नेटवर्क गोपनीयता सूचना

गूगल अ‍ॅनालिटिक्स गोपनीयता सूचना

गूगल रीमार्केटिंग/पुनर्विपणन

फेसबुक रीमार्केटिंग/पुनर्विपणन

आपल्या वैयक्तिक माहितीबद्दल आमच्याशी संपर्क साधणे

सेटिंग्जचा मागोवा घेऊ नका

आपल्या क्रेडिट कार्डचा वापर

सीओपीपीए (बालकांच्या ऑनलाइन खाजगीपणाच्या संरक्षणाचा कायदा)

आमच्या गोपनीयता धोरणाबद्दल प्रश्न

आपले अधिकार
आमची वेबसाइट वापरताना आणि आम्हाला वैयक्तिक माहिती प्रस्तुत करताना आपल्याला जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (जीडीपीआर) आणि इतर कायद्यांनुसार काही अधिकार असू शकतात. आपल्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करण्याच्या कायदेशीर आधारांवर अवलंबून, आपल्याला पुढीलपैकी काही किंवा सर्व अधिकार असू शकतात:

माहीत करून घेण्याचा अधिकार

आम्ही आपल्याकडून गोळा करतो ती वैयक्तिक माहिती आणि तिच्यावर आम्ही प्रक्रिया कशी करतो याबद्दल माहीत करून घेण्याचा अधिकार आपल्याला आहे.

प्रवेशाचा अधिकार

आपल्याला आपल्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया होत असल्याची पुष्टी आणि आपल्या वैयक्तिक माहितीत प्रवेश करण्याची क्षमता मिळवण्याचा अधिकार आहे.

दुरुस्त करण्याचा अधिकार

आपली वैयक्तिक माहिती चुकीची किंवा अपूर्ण असल्यास ती दुरुस्त करण्याचा आपल्याला अधिकार आहे.

खोडले जाण्याचा अधिकार (विसरले जाण्याचा अधिकार)

आपल्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया सुरू ठेवण्याचे कोणतेही सक्तीचे कारण आमच्याकडे नसल्यास आपली वैयक्तिक माहिती काढून टाकण्याची किंवा खोडण्याची विनंती करण्याचा अधिकार आपल्याला आहे.

प्रक्रिया करणे मर्यादित करण्याचा अधिकार

आपल्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करणे ‘ब्लॉक’ किंवा मर्यादित करण्याचा अधिकार आपल्याला आहे. जेव्हा आपली वैयक्तिक माहिती मर्यादित केली जाते, तेव्हा आम्हाला आपली माहितीची साठवण करण्यास परवानगी असते, परंतु तिच्यावर पुढे प्रक्रिया करण्याची परवानगी नसते.

डेटा पोर्टेबिलिटीचा अधिकार

आपण आम्हाला प्रदान केलेली आपली वैयक्तिक माहिती विनंती करून मिळवण्याचा आणि ती आपल्या स्वतःच्या उद्देशांसाठी वापरण्याचा आपल्याला अधिकार आहे. आम्ही आपल्या विनंतीनंतर आपला डेटा आपल्याला 30 दिवसांच्या आत प्रदान करू. आपल्या वैयक्तिक माहितीची विनंती करण्यासाठी, कृपया या गोपनीयता सूचनेच्या शीर्षस्थानी  असलेली माहिती वापरुन आमच्याशी संपर्क साधा.

आक्षेप घेण्याचा अधिकार

खालील कारणांसाठी आपल्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करण्यास आम्हाला आक्षेप घेण्याचा अधिकार आपल्याला आहे:

प्रक्रिया करणे कायदेशीर हितसंबंधांवर किंवा लोकांच्या हिताचे कार्य करण्याच्या/अधिकृत प्राधिकाराच्या (रूपरेखा सह) वापरावर आधारित होते;

· थेट विपणन (रूपरेखा सह);

· प्रक्रिया करणे वैज्ञानिक/ऐतिहासिक संशोधन आणि आकडेवारीच्या उद्देशाने होते.

· स्वयंचलित वैयक्तिक निर्णय घेण्याच्या -प्रक्रिया आणि रूपरेखा यांचा वापर केला गेला.

· प्राधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणे

सामान्य डेटा संरक्षण नियमनच्या अनुपालनानुसार आपल्या माहितीवर प्रक्रिया न केली गेल्यास पर्यवेक्षी प्राधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा अधिकार आपल्याला आहे. पर्यवेक्षी प्राधिकारी आपल्या तक्रारीचा योग्य प्रकारे निपटारा करण्यात अपयशी ठरले, तर आपल्याला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार असू शकतो.

आम्ही कोणती वैयक्तिक माहिती गोळा करतो?

आपण आमच्या वेबसाइटला भेट देता तेव्हा आम्ही आपल्याकडून माहिती गोळा करत नाही. आम्ही ऑर्डर घेण्याचा, बातमीपत्राचे सदस्यत्व घेण्याचा किंवा आमच्या वेबसाइटवर माहिती प्रविष्ट करण्याचा मार्ग देऊ करत नाही. आमच्या वेबसाइटवर कोणतीही प्रपत्रे किंवा संपर्क भरण्याची क्षेत्रे नाहीत. हे जाणीवपूर्वक आहे. आपल्या संगणकावरील आयपी ऍड्रेसद्वारे आपल्या इंटरनेटच्या वापरातून वैयक्तिक  नसलेली माहिती गोळा केल्या जाणा-या माहितीचे खाली वर्णन केले आहे. आपण आमच्या वेबसाइटसह अन्य वेबसाइटला भेट देता तेव्हा तृतीय पक्षांद्वारे गोळा केली जाते त्या माहितीचा यात समावेश होतो.

आपण आमची वेबसाइट ब्राउझ करता तेव्हा आम्हाला होस्टिंग सर्व्हर्सद्वारे नोंदवलेला रहदारी डेटा, काही वैयक्तिक नसलेली माहिती आणि आपल्या संगणकाचा इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) ऍड्रेस वाटणार्‍या कुकीज प्राप्त होऊ शकतात. आम्ही गूगल अ‍ॅनालिटिक्स सारख्या इतर बाह्य सेवांनी रहदारी विश्लेषणासाठी देऊ केलेल्या माहितीचाही वापर करू शकतो.

आम्ही आपली माहिती कशी वापरतो?

आम्ही गूगल अ‍ॅनालिटिक्स सारख्या तृतीय पक्षांकडून गोळा करतो त्या वैयक्तिक नसलेल्या माहितीचा वापर खालील मुख्य उद्देशांसाठी करू शकतो:

· वेबसाइट चालवण्यासाठी आणि तेथे वर्णन केलेली माहिती आपल्याला पुरवण्यासाठी.

· आमच्या वेबसाइटची आणि पुरवलेल्या माहितीची गुणवत्ता सुधारण्यासाठी.

· अंतर्गत नोंदी ठेवणे आणि सांख्यिकीय उद्देशांसाठी.

आपली वैयक्तिक माहिती वापरण्यासाठी पार्श्वभूमी

आपल्यासंबंधी आम्ही गोळा करतो आणि साठवतो ती माहिती मुख्यतः आपल्याला माहिती प्रदान करण्यासाठी आम्हाला सक्षम करण्याकरिता वापरली जाते.

सहयोगी आणि इतर तृतीय पक्षांशी माहिती शेअर करणे

आम्ही आमच्या वापरकर्त्यांविषयी कोणतीही वैयक्तिक नसलेली अभ्यागत माहिती किंवा वैयक्तिक माहिती यांची तृतीय पक्षांकडे विक्री, व्यापार किंवा अन्यथा हस्तांतरण करणार नाही.

यामध्ये आमची वेबसाइट चालवण्यात, (वकील आणि वैद्यकीय संशोधकांसह) आमचा व्यवसाय चालवण्यात मदत करणारे इतर पक्ष, वैद्यकीय संशोधन आणि आमच्या मालमत्तांची विक्री, अधिग्रहण किंवा विलीनीकरण यांसारख्या उद्योग व्यवसाय प्रचालनांमधील व्यवसाय भागीदार किंवा संभाव्य व्यवसाय भागीदार यांचा समावेश नाही. ते सर्व पक्ष ही माहिती गोपनीय ठेवण्यासाठी आणि वैयक्तिक डेटा संरक्षणावरील कायदे आणि नियमांनुसार त्यांची वागणूक ठेवण्यासाठी सहमत आहेत.

कायद्याची पूर्तता करणे, आमच्या केंद्राची धोरणे अंमलात आणणे किंवा आमचे किंवा इतरांचे अधिकार, मालमत्ता किंवा सुरक्षितता यांचे संरक्षण करणे यासाठी योग्य असेल तेव्हा आम्ही माहिती जाहीर करू शकतो.

तथापि, वैयक्तिक नसलेली अभ्यागत माहिती विपणन, जाहिरात किंवा इतर तत्सम वापरांसाठी इतर पक्षांना पुरवली जाऊ शकते.

आम्ही आपली माहिती कशी संरक्षित करतो?

आम्ही आमच्या वेबसाइटला भेट देणाऱ्या अभ्यागताकडून वैयक्तिकरित्या ओळख पटवली जाण्याजोगी माहिती गोळा करत नाही. आपली वैयक्तिक नसलेली अभ्यागत माहिती सुरक्षित सर्व्हर आणि नेटवर्कवर साठवली जाते आणि तिच्यात ज्यांना अशा प्रणालींवर विशेष प्रवेश अधिकार आहेत अशा फक्त मर्यादित संख्येतील लोकांनाच प्रवेश आहे आणि त्यांना माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक केले आहे.

आम्ही आपल्या वैयक्तिक माहितीची सुरक्षितता संरक्षित करण्यासाठी उद्योग-मानक सुरक्षा उपाय आणि अधिकृतता तपासणी साधने वापरून आमची वेबसाइट तयार केली आहे. आम्ही आणि आमच्यासाठी सेवा प्रदान करणारे तृतीय पक्ष, आपली वैयक्तिक माहिती संरक्षित करण्यासाठी तांत्रिक आणि भौतिक सुरक्षा उपाय देखील व्यवस्थापित करतात. दुर्दैवाने, आपली वैयक्तिक माहिती गमावली न जाणे किंवा तिचा गैरवापर न होणे किंवा इंटरनेटवर सुरक्षित डेटा वहन याची हमी इंटरनेटच्या स्थायीभावामुळे देऊ शकत नाही. आपल्या आमच्या वेबसाईटला होणा-या भेटीत वैयक्तिक नसलेली माहिती गोळा  करणा-या तीस-या पक्षासाठी, वेबसाईट निर्गमनाच्या काही पर्यायांचे अनुसरण करून आपण आपला  वैयक्तिक डेटा संरक्षित करावा व तो इतर कोणाशीही सामायिक करू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे.  खासकरुन जर आपण सार्वजनिक ठिकाणी संगणक वापरत असाल किंवा तो सामायीकरीत्या वापरत असाल, तर आपण वेब ब्राउझरचा वापर संपल्यावर त्यातून नेहमीच लॉग आउट केलेच पाहिजे.

आपली वैयक्तिक माहिती राखणे आणि नष्ट करणे

आपल्या आमच्या वेबसाईटला होणा-या भेटीत वैयक्तिक नसलेली अभ्यागत माहिती आम्ही फक्त कायदेशीर किंवा व्यावसायिक उद्देशांसाठी आम्हाला तिची आवश्यकता आहे तोपर्यंतच राखतो. आपली माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, कागदी स्वरूपात किंवा दोन्हींच्या एकत्रित स्वरूपात राखली जाऊ शकते. आपली माहिती यापुढे आवश्यक नसल्यास आम्ही ती नष्ट करू, हटवू किंवा खोडू.

कायदेशीररित्या आवश्यक माहिती जाहीर करणे

आपली वैयक्तिक माहिती उघड करणे (अ) सबपिना (कोर्टासमोर हजर राहण्याचा हुकुम), कायदा किंवा इतर कायदेशीर प्रक्रियेमुळे आवश्यक असल्यास; (ब) कायदा अंमलबजावणी अधिकारी किंवा सरकारी अंमलबजावणी संस्था यांना मदत करण्यासाठी आवश्यक असल्यास; (क) आमच्या कायदेशीर अटींच्या उल्लंघनांची चौकशी करण्यासाठी किंवा त्यांची अन्यथा अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असल्यास; (ड) कायदेशीर कारवाईपासून संरक्षण करण्यासाठी किंवा आपण आणि/किंवा अन्य वापरकर्त्यांच्या किंवा सदस्यांच्या समावेशासहित, तृतीय पक्षाच्या दाव्यांपासून आमचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असल्यास; किंवा (ई) आमची कंपनी, वापरकर्ते, कर्मचारी आणि सहयोगींचे कायदेशीर अधिकार, वैयक्तिक/वास्तविक मालमत्ता किंवा वैयक्तिक सुरक्षा संरक्षित करणे आवश्यक असल्यास आम्हाला ती उघड करणे कायद्याने आवश्यक असू शकते.

उत्तराधिकाऱ्यांना उघड करणे

आमचा व्यवसाय विकला गेला किंवा जो आपल्याला वेबसाइट प्रदान करण्यासाठी जबाबदार होईल अशा अन्य व्यवसायात संपूर्ण किंवा काही प्रमाणात विलीन झाला तर आम्ही आपली वैयक्तिक माहिती नवीन व्यवसायाकडे हस्तांतरित करण्याचा अधिकार राखतो. हा नवीन व्यवसाय या गोपनीयता सुचनेच्या अटींनुसार तसेच नवीन व्यवसायाद्वारे स्थापित केलेल्या या गोपनीयता सूचनांमधील कोणत्याही बदलांनुसार आपली वैयक्तिक माहिती वापरण्याचा अधिकार राखेल. आमच्या कंपनीने दिवाळखोरीसाठी दावा केल्यास आणि आमची काही किंवा सर्व मालमत्ता अन्य व्यक्ती किंवा व्यवसायाला विकली गेल्यास आम्ही आपली वैयक्तिक माहिती हस्तांतरित करण्याचा अधिकार देखील राखतो.

आपली वैयक्तिक माहिती वापरण्याबद्दलची आपली संमती मागे घेणे

आपल्याला आपली वैयक्तिक माहिती वापरण्याबद्दलची आम्हाला दिलेली संमती कधीही मागे घेण्याचा अधिकार आहे. अशा मागे घेण्यामुळे कायद्याने परवानगी असलेल्या प्रकटीकरणांवर परिणाम होणार नाही, ज्यात समावेश आहे परंतु इतकेच मर्यादित नाही: (i) सहयोगी आणि व्यवसाय भागीदारांना उघड करणे, (ii) संगणक प्रणाली सेवा, डेटा व्यवस्थापन सेवा यांसारख्या आमच्या व्यवसायासाठी विशिष्ट सेवा प्रदान करणार्‍या, आणि इतर जे वेबसाइट व्यवस्थापीत करण्यास मदत करतात अशा तृतीय-पक्षाच्या सेवा प्रदात्यांना उघड करणे (iii) आपल्या विनंत्या पूर्ण करण्यासाठी तृतीय पक्षाला आवश्यक तेथे उघड करणे, (iv) सरकारी संस्था किंवा कायद्याची अंमलबजावणी विभागांना किंवा लागू कायद्यानुसार तसे करणे आवश्यक आहे तेथे उघड करणे, (v) तृतीय पक्षाकडे आधीच पूर्ण केलेली प्रकटीकरणे. आपण आपली वैयक्तिक माहिती वापरण्यासाठीची आपली संमती मागे घेऊ इच्छित असल्यास आपण या सूचनेच्या शीर्षस्थानी असलेली संपर्क माहिती वापरुन आमच्याशी संपर्क साधू शकता.

आंतरराष्ट्रीय डेटा हस्तांतरणे आणि साठवण

आमच्या वेबसाइटवरील आपल्या भेटीमधून आम्ही गोळा करतो अशी वैयक्तिक नसलेली माहिती आम्ही ज्या देशांत कार्य करतो त्यापैकी, विशेषत: युनायटेड स्टेट्समध्ये साठवली, प्रक्रिया केली आणि हस्तांतरित केली जाऊ शकते. जीडीपीआरच्या कलम 45 नुसार युरोपीयन युनियनला अमेरिका मध्ये वैयक्तिक माहितीला पुरेशा प्रमाणात संरक्षण दिलेले आढळले नाही. जीडीपीआरच्या कलम 49 मध्ये व्याख्या केल्यानुसार विशिष्ट परिस्थितींसाठी असलेल्या मोकळिकींवर आमची कंपनी अवलंबून आहे. युरोपियन युनियन ग्राहक आणि वापरकर्त्यांसाठी आपल्या संमतीने आपली वैयक्तिक माहिती युरोपियन युनियनच्या बाहेर अमेरिकेत हस्तांतरित केली जाऊ शकते. आम्ही जेथे कोठे आपली वैयक्तिक माहिती हस्तांतरित करतो, तिच्यावर प्रक्रिया करतो किंवा ती साठवतो, तेथे आम्ही तिचे संरक्षण करण्यासाठी वाजवी पावले उचलू. आम्ही आपल्याकडून गोळा करतो ती माहिती आमच्या गोपनीयता सूचनेनुसार वापरू. आमची वेबसाइट वापरुन, आपण या विभागात वर्णन केलेल्या आपल्या वैयक्तिक माहितीच्या हस्तांतरणाला संमती देता.

वेब बीकॉन्स

आमच्या वेबसाइटवरील आपल्या वापराबद्दल वैयक्तिक नसलेली माहिती गोळा करण्यासाठी आम्ही वेब बीकॉन्स नावाचे तंत्रज्ञान वापरू शकतो. आम्ही वेब बीकॉन्सद्वारे गोळा करू अशी माहिती आम्हाला आमच्या अभ्यागतांच्या वर्तनाचे आकडेवारीनुसार निरीक्षण करू देईल.

गूगल अ‍ॅड आणि सामग्री नेटवर्क गोपनीयता सूचना

गूगल सह तृतीय-पक्षाचे विक्रेते वापरकर्त्याच्या आमच्या वेबसाइटवरील मागील भेटींवर आधारित जाहिराती दर्शवण्यासाठी कुकीज वापरतात. गूगल च्या डबलक्लिक कुकीचा वापर त्यांना आणि त्यांच्या भागीदारांना आमच्या साइटवरील आणि/किंवा इंटरनेटवरील अन्य साइट्सवरील वापरकर्त्यांच्या भेटींच्या आधारे त्यांना जाहिराती दर्शवण्यास सक्षम करते. http://www.aboutads.info/choices/ येथे भेट देऊन वापरकर्ते स्वारस्य-आधारित जाहिरातींसाठी डबलक्लिक कुकीच्या वापरातून बाहेर पडू शकतात. युरोपियन वापरकर्त्यांसाठी http://www.youronlinechoices.eu येथे भेट द्या.

गूगल अ‍ॅनालिटिक्स गोपनीयता सूचना

आमच्या वेबसाइटच्या वापराबद्दल माहिती गोळा करण्यासाठी आमची वेबसाइट गूगल अ‍ॅनालिटिक्स वापरू शकते. गूगल अ‍ॅनालिटिक्स वापरकर्त्यांकडून वय, लिंग, रूची, लोकसंख्याशास्त्र तपशील, ते आमच्या वेबसाइटला किती वेळा भेट देतात, कोणत्या पृष्ठांना भेट देतात आणि आमच्या वेबसाइटवर येण्यापूर्वी त्यांनी कोणत्या इतर वेबसाइट वापरली आहेत यांसारखी माहिती गोळा करते. आम्ही गूगल अ‍ॅनालिटिक्स कडून मिळालेल्या माहितीचा वापर रहदारीचे विश्लेषण करण्यासाठी, वापरकर्त्यांना आमची उत्पादने आणि सेवांची पुनर्विपणन करण्यासाठी, आमचे विपणन, जाहिराती आणि आमची वेबसाइट सुधारण्यासाठी करू शकतो. आम्ही गूगल अ‍ॅनालिटिक्स सह पुनर्विपणन, गूगल डिस्प्ले नेटवर्क इम्प्रेशन रिपोर्टिंग आणि गूगल अ‍ॅनालिटिक्स डेमोग्राफिक्स आणि इन्टरेस्ट रिपोर्टिंग यांसारखी गूगल अ‍ॅनालिटिक्स जाहिरात वैशिष्ट्ये सक्षम करू शकतो. गूगल अ‍ॅनालिटिक्स आपण आमच्या वेबसाइटला भेट दिलेल्या तारखेला आपल्याला नियुक्त केलेला आयपी एड्रेस गोळा करते, आपले नाव किंवा इतर ओळखू शकणारी माहिती नाही. आम्ही गूगल अ‍ॅनालिटिक्स वापरुन गोळा केलेली माहिती वैयक्तिक माहितीशी एकत्रीकरण करत नाही. आपण पुढील वेळी जेव्हा आपण आमच्या वेबसाइटला भेट द्याल तेव्हा अद्वितीय वापरकर्ता म्हणून आपल्याला ओळखण्यासाठी गूगल अ‍ॅनालिटिक्स आपल्या वेब ब्राउझरवर कायमस्वरुपी कुकी ठेवत असले, तरी ही कुकी गूगल व्यतिरिक्त अन्य कोणालाही वापरता येत नाही. आमच्या वेबसाइटच्या वापराविषयी माहिती गोळा करण्यात मदत करण्यासाठी गूगल विशिष्ट अभिज्ञापक म्हणजे ओळख चिन्हें देखील वापरते. गूगल आपला डेटा कसा गोळा करते आणि त्यावर प्रक्रिया करते याबद्दल अधिक माहितीसाठी https://www.google.com/policies/privacy/partners/ येथे भेट द्या.

आपण या लिंकवर बाहेर पडण्याची निवड करुन आपली माहिती वापरण्यापासून गूगल अ‍ॅनालिटिक्स ला प्रतिबंधित करू शकता: https://tools.google.com/dlpage/gaoptout.

गूगल रीमार्केटिंग/पुनर्विपणन

आमची वेबसाइट पुनर्विपणन जाहिरात सेवा वापरू शकते. गूगल आणि इतर कंपन्यांद्वारे पुरविल्या गेलेल्या पुनर्विपणन सेवा इंटरनेटवरील वेबसाइट्सवर जाहिराती दर्शवितात. पुनर्विपणनासह, आपण यापूर्वी शोधलेल्या उत्पादनांसाठी जाहिराती पाहू शकता. उदाहरणार्थ, समजा आपण संगणक विकणार्‍या वेबसाइटला भेट दिली परंतु आपण त्या वेबसाइटच्या आपल्या पहिल्या भेटीत संगणक विकत घेतला नाही. त्या वेबसाइटचा मालक आपल्याला आपण भेट देत असलेल्या इतर वेबसाइट्सवर आपल्याला तीच किंवा तत्सम जाहिरात पुन्हा दर्शवून त्याच्या साइटला पुन्हा भेट देण्यासाठी आणि संगणक विकत घेण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छित असू शकतो. आम्ही अशाच हेतूंसाठी पुनर्विपणन वापरू शकतो. हे होण्यासाठी, गूगल आपल्या ब्राउझरमध्ये आधीपासून असलेली एक कुकी वाचेल किंवा आपण आमच्या साइटला किंवा अन्य साइटना भेट देता तेव्हा ते पुनर्विपणन वापरुन आपल्या ब्राउझरमध्ये एक कुकी ठेवतील.

आपण या लिंकवर गूगल च्या कुकीजच्या वापरातून आणि पुनर्विपणनातून बाहेर पडण्याची निवड करू शकता: https://support.google.com/ads/answer/2662922?hl=en किंवा आपण येथे नेटवर्क अ‍ॅडव्हर्टायझिंग इनिशिएटिव्ह ऑप्ट-आऊट पृष्ठ वापरुन बाहेर पडण्याची निवड करू शकता: http://optout.networkadvertising.org/#!/.

फेसबुक रीमार्केटिंग/पुनर्विपणन

फेसबुक सहित, तृतीय पक्ष आमच्या वेबसाइटवरून आणि इतरत्र इंटरनेटवरून माहिती गोळा किंवा प्राप्त करण्यासाठी कुकीज, वेब बीकॉन्स आणि इतर साठवण तंत्रज्ञाने वापरू शकतात आणि मापन सेवा आणि लक्ष्यित जाहिराती प्रदान करण्यासाठी त्या माहितीचा वापर करू शकतात. आपण आमच्या साइटला भेट दिल्यानंतर फेसबुक रीमार्केटिंग/पुनर्विपणन मुळे आपल्याला फेसबुक वर आमच्या जाहिराती दिसतील. असे होण्यासाठी, फेसबुक एक कस्टम ऑडियन्स पि़क्सेल वापरते, जे एखादा अभ्यागत एखाद्या वेबपृष्ठावर उतरतो तेव्हा सक्रिय होते आणि अभ्यागताच्या ब्राउझरमध्ये एक अद्वितीय “कुकी” ठेवते. फेसबुक लुकअलाईक ऑडियन्स टार्गेटिंग आमच्यासारख्या वेबसाइट्सना आमच्या वेबसाइटला आधीच भेट दिलेल्या वापरकर्त्यांसारखेच असलेल्या लोकांना फेसबुकवर जाहिराती दर्शवू देते. फेसबुक च्या जाहिरात लक्ष्यीकरणासाठी माहितीचा संग्रह आणि वापर यातून बाहेर पडण्यासाठी येथे भेट द्या: https://www.facebook.com/help/568137493302217.

आपल्या वैयक्तिक माहितीबद्दल आमच्याशी संपर्क साधणे

या सूचनेच्या शीर्षस्थानी आढळणाऱ्या संपर्क माहितीचा वापर करुन आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आम्ही आमचा वैयक्तिक माहितीचा वापर समजावून देण्यात आपल्याला मदत करू. तथापि आम्ही आमच्या करारांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कोणत्याही कायदेशीर उत्तरदायित्वांचे पालन करण्यासाठी गरज असलेली आपली वैयक्तिक माहिती ठेवू शकतो.

मागोवा घेऊ नका सेटिंग्ज

काही वेब ब्राउझरमध्ये अशी सेटिंग्ज असतात जी आमच्या वेबसाइटने आपल्या हालचालीचा मागोवा घेण्यास नकार देण्यासाठी विनंती करण्यास आपल्याला सक्षम करतात. आपण आपल्या ब्राउझरचा वापरकर्ता मार्गदर्शक संदर्भित करून आपल्या ब्राउझरमधील ट्रॅकिंग वैशिष्ट्ये आणि इतर सुरक्षितता सेटिंग्ज बंद करू शकता.

आमचे ईमेल धोरण

आम्ही आपला ईमेल पत्ता गोळा करत नाही. आमच्या व्यवसाय पद्धतीचा एक भाग म्हणून, या सूचनेच्या शीर्षस्थानी दिलेली संपर्क माहिती वापरुन आपण आमच्याशी संपर्क साधल्याशिवाय आम्ही ईमेलद्वारे आपल्याशी संपर्क साधणार नाही. आपण ईमेलद्वारे आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही फक्त आपण प्रारंभ केलेल्या संप्रेषणालाच उत्तर देऊ. आम्ही आपल्या ईमेल पत्त्याला या सूचनेमध्ये वर्णन केलेल्या आपल्या वैयक्तिक माहितीबाबतच्या वागणुकीशी संबंधित धोरणांनुसार वागणुक देऊ.

आपल्या क्रेडिट कार्डचा वापर

आमची वेबसाइट आर्थिक व्यवहारांवर प्रक्रिया करत नाही.

सीओपीपीए (बालकांच्या ऑनलाइन खाजगीपणाच्या संरक्षणाचा कायदा)

आम्ही 16 वर्षाखालील बालकांकडून जाणूनबुजून वैयक्तिक माहिती गोळा करत नाही. आपण मातापिता किंवा पालक असल्यास आणि आपले अपत्य आमची वेबसाइट वापरत असल्याचे आपल्याला वाटत असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. आपण पोचपावती देता की आम्ही आमच्या वापरकर्त्यांचे वय पडताळत नाही किंवा तसे करण्याचे कोणतेही उत्तरदायित्व आमच्यावर नाही.

आमच्या गोपनीयता धोरणाबद्दल प्रश्न

आमच्या गोपनीयता धोरणांबद्दल आपल्याला कोणतेही प्रश्न असल्यास, कृपया या गोपनीयता सूचनेच्या शीर्षस्थानी असलेली माहिती वापरुन आमच्याशी संपर्क साधा.


सध्या जगभरातील चिकित्सालयीन संशोधन केंद्रांमध्ये नोकरभरती केली जात आहे. आपल्याजवळचे संशोधन केंद्र शोधण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

GB 4.1.5.3 Cessa flavicon.png
 

Cristcot HCA LLC 9 Damonmill Square, Suite 4A, Concord, MA 01742 USA

गोपनीयता धोरण | वापरण्याबाबत अटी

सेसा हे अल्सरेटिव्ह कोलायटिस असलेल्या रूग्णांसाठीच्या चालू चिकित्सालयीन संशोधन चाचणीचे नाव आहे. हे व्यावसायिकतत्त्वावर उपलब्ध असलेले उपचार नाहीत.

आपल्याला आयबीडीशी संबंधित लक्षणे जाणवत असतील तर आपल्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टशी संपर्क साधा.